शासकीय वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या खालील दोन योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे :

1️⃣ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
2️⃣ मागासवर्गीय मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह

📌 इच्छुक विद्यार्थी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

⏳ सूचना: अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करावेत.